आमच्याबद्दल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित , विष्णुपुरी, नांदेड- 431606
एनएनडी/एनएनडी/बीएनके/ओ/340/ऑफ2002/ संस्थेच्या संकेत स्थळावर भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनपुर्वक स्वागत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्व कार्यरत असलेले कर्मचारी हे या पतसंस्थेचे सभासद असून सध्यस्थितीत संस्थेची सभासद संख्या 502 आहे.
संस्थेच्या सभासदांकडून ठेवी गोळा करणे तसेच गरजू सभासदांना कर्ज पुरवणे हे संस्थेचे प्रमुख कार्य आहे.
सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
संस्थेच्या विकासाकरिता व उन्नती करिता मार्गदर्शन, सुचना व अभिप्राय अपेक्षित आहे.


अध्यक्षीय मनोगत
सन्माननीय सभासद बंधू-भगिनी, सप्रेम नमस्कार, संस्थेच्या संस्थापक मंडळाने लावलेल्या छोट्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे
या सर्वात संस्थापक मंडळ, संचालक व सर्व सभासदांचा मोलाचा हातभार आहे
आपल्या संस्थेची माहिती एका क्लिकवर सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी आपण या संकेतस्थळाची (वेबसाईटची) निर्मिती केली आहे. सदरचे संकेतस्थळ आपणा सर्वांसाठी खुले करत आहोत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

आभार
आपल्या संस्थेचे संकेतस्थळ तयार केल्यामुळे संगणकाच्या माध्यमातून माहीतीचे आदान प्रदान करणे सभासदांना सहज शक्य होणार आहे.
संस्थेचे संकेतस्थळ असले पाहिजे ही कल्पना एखाद्या सभासदाच्या मनात निर्माण होणे आणि ती त्याने प्रत्यक्षात आणणे ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.